महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन यासाठी देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे महत्वपूर्ण योगदान : डॉ.सुधाताई कांकरिया

राहूरी फॅक्टरी: आशपाक सय्यद

“स्वराज्या कडून सुराज्याकडे जाण्यासाठी आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णीम भारत की और हा महत्वपूर्ण उपक्रम असुन स्वच्छ भारत अभियान, हरित भारत – स्वस्थ भारत, योग विद्या, महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन यासाठी देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे, त्यामुळेच या शहराला अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत, महिला भगिनींनी आता पुढाकार घेऊन स्वच्छता व पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने काम केले पाहिजे,” असे मत बेटी बचाव ! बेटी पढाव ! अभियान च्या समन्वयक डॉ.सुधाताई कांकरिया यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, शिवचरित्रकार हसन सय्यद, राहुरीच्या नंदा दिदी, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, अप्पासाहेब ढूस, देवळालीप्रवरा केंद्राच्या विजया दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी देवळालीप्रवरा नगरपरिषद अंतर्गत स्वच्छ भारत अभियान २०२२ व वसुंधरा संवर्धन अभियान २.० अंतर्गत कार्याची व विविध योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमात बेटी बचाव ! बेटी पढाव ! अभियान च्या समन्वयक डॉ.सुधाताई कांकरिया यांनी स्वच्छ भारत अभियान, हरित भारत- स्वस्थ भारत, योग विद्या, महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले. देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे स्वच्छता व पर्यावरण दूत शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी राहूरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील विदयार्थ्याचे स्वच्छ भारत अभियान व वसुंधरा संवर्धन यावर पथनाट्य तयार करून सादर केले. श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक पथनाट्यास माजी आमदार चंद्रशेखर पा कदम यांनी रोख पारितोषिक दिले.
यावेळी प्रियातमाताई कदम, माजी नगरसेविका संगीताताई चव्हाण, नगरपरिषचे कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, एस.के.मोटे, अमोल दातीर, कपिल भावसार, राजेंद्र हारगुडे, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, महिला आर्थिक विकास महामंडळच्या वंदना आल्हाट, समुदाय संघटिका सविता हारदे यांच्या सह परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जनजागृती पथनाट्यसाठी हायस्कूलचे विशाल तागड, युसूफ तांबोळी, नितीन घोलप, गणेश विघे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया दिदी यांनी केले. शेवटी सहा.ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!