वनघरे फाऊंडेशनच्या माध्यमातून नाराळाचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप..

कर्जत प्रतिधिनी : संजय कदम

कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या साळोख ग्राम पंचायत मधील नाराळाचीवाडी येथे वनघरे फांउडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप
विद्यार्थ्यांना शैक्षणिक, बौद्धीक सुविधाची मदत व्हावी म्हणून कर्जत तालुक्यात कार्यरत असणारी तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत असणारी योगेश वनघरे फाऊंडेशन कल्याण या संस्थेने कळंब केंद्रातील रायगड जिल्ह्यात परिषद प्राथमिक शाळा नारळाचीवाडी या जिल्ह्या परिषद शाळेतील एकूण 44 विद्यार्थ्यांना आज दिनांक 12 मार्च 2022 रोजी शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप केले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक खर्डे सर तसेच विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रम समयी संस्थेचे सर्वेसर्वा योगेश वनघरे, दत्ता लोंढे, सागर वनघरे, रोहन वनघरे तसेच नारळाचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खर्डे सर,हरीचंद्र आढारी सर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!