गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

दौंड:- आलिम सय्यद,

सोलापुर- पुणे राष्टीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत पाटस टोलनाका येथे हातभटटी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले . त्याचेकडुन वाहनासह सुमारे ४,७१,३५० / – रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आली असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले . ( ता.१३ मे ) रोजी पोलीस हवालदार निलेश कदम , गुरूनाथ गायकवाड , अक्षय यादव , रामदास जगताप , प्रविण चौधर यांचे पथक यवत पोलीस स्टेशन हददीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की , सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे स्वीप्ट एम.एच.१२ ए.टी .७८९ ४ या वाहनामध्ये एक इसम गावठी हातभट्टीची तयार दारू वाहतुक करीत असलेबाबत माहिती मिळाल्याने वरील पोलीस कर्मचारी व पाटस पोलीस दुरक्षेत्र येथील सहा फौजदार सांगर चव्हाण , पो.हवा . संजय देवकाते यांनी पाटस टोलनाका येथे नाकाबंदी करीत असताना मिळाले माहिती प्रमाणे मारूती स्वीप्ट नं . एम.एच .१२ ए.टी. ७८९४ ही येताना दिसली असता वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅरीकेट लावुन सदर वाहन व त्यावरील चालक अमित धुल्ला गुडदावत ( वय २४ वर्ष ) , रा . शेलारवाडी , गाडामोडी , ता.दौड , जि.पुणे यास ताब्यात घेवुन गाडीची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये गावठी हातभटटीची तयार दारूची सात कॅन्ड असा वाहनासह किंमत रूपये ४,७१,३५० / – रू चा मुददेमाल जप्त करणेत आला असुन आरोपीस अटक करणेत आलेली आहे . सदरची कामगिरी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली सहा फौजदार सागर चव्हाण , पो.हवा . संजय देवकाते , निलेश कदम , गुरूनाथ गायकवाड , अक्षय यादव , रामदास जगताप , प्रविण चौधर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!