कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट

कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट

दौंड : आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, बोरिबेल परिसरात मटका अवैद्य धंद्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सर्रासपणे अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सर्रास अवैध धंदे चालू असल्याने या भागात अवैध धंदेवाले यांनी आपली मटका, दारू, हातभट्टटी, यांची दुकाने थाटली आहे. याने अनेकांचे संसार उदवस्त झाले आहेत मात्र
संबंधित विभाग मूग गिळून गप्प आहे.

कुरकुंभ परिसरात तीन ते चार ठिकाणी मटका बेकायदेशीर चालु आहे. हा मटका बाजार पेठेलागत, बाजार तळालागत तसेच सर्व्हिस रस्त्यालगत पत्र्याच्या शेड मध्ये मटका हा जोमात सुरू आहे. तर पाटस येथे बाजार पेठेतच मटका जोमात सुरू असल्याने येथे मटका खेळणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या ठिकाणाहून महिला वर्ग ये जा करत असल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कुरकुंभ येथे काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर मटका दोन ठिकाणी दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. परंतु दिवस उलटताच लगेच पुन्हा हा बेकायदेशीर मटका अवैद्य व्यवसाय जोमात सुरू होतो. मंग यांना खत पाणी घालतं तरी कोण असा सवाल येथील नागरिक महिला वर्ग करत आहे. या कुरकुंभ, पांढरेवाडी, ग्रामपंचायत हद्दीत अजूनही , हातभट्टी छोट्या मोठ्या हॉटेल वर बेकायदेशीरपणे दारू विकणे यांची बेकायदेशीर पणे आपली दुकाने थाटली आहेत. कुरकुंभ हे औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी अवैध धंदे जोमात चालू होत असल्याने , अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दरम्यान बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा, पोलिस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नाहीत, कोण पोलिस आमचे कोणीसुद्धा काही करू शकत नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. हे धंदे करणाऱ्या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे की काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच या अवैद्य धंद्यांवाल्यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहेत. या बेकायदा मटका, जुगार, दारू हातभट्टी, या सर्व प्रकारच्या अवैध धंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे नागरिक बोलत आहे. अवैध धंदे जोमात असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नीचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने यांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे,

तसेच बेकायदेशीर मटका, जुगार, दारू लोकवस्ती व बाजार पेठेलगत असल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, या सर्व अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावेत आणि अवैध धंदे करणारे मालक व कामगारांवर कडक कारवाई करून यांना लवकरात लवकर जिल्हामधुन तडीपार करण्यात यावे अशी मागणी महिला आणि ग्रामस्थ करीत आहेत,

 

……..बॉक्स………

पोलीस अवैद्य धंद्यांवर कारवाई करतात परंतु कारवाई झाली की पुन्हा लगेच हे अवैद्य धंदे जोमात सुरू होतात. मात्र ही कारवाई नाममात्र केली जात असल्याचं महिला वर्गातून बोललं जातंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!