कुरकुंभ एम आयडीसी चौकात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: एक ठार तर तीन जण गंभीर जखमी…

दौंड- पुणे :- आलिम सय्यद,

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी चौकात दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला..यामध्ये पुण्याकडून सोलापूर कडे जाणाऱ्या कारने(एम.एच. ०४ एमएच ७९०६) महामार्गावरील लोखंडी बॅरेकेट तोडुन दुभाजकाच्या पलीकडे जाऊन सोलापुरहुन पुण्याला जाणाऱ्या कार ( एमएच ४२ के ७७५९) या कारवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला..या अपघातात रामदास कृष्णा झगडे(रा.सिद्धेश्वर निंबोडी,वय वर्ष.७०) हे ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत..जखमी मध्ये एका महिलेचा समावेश आहे..हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनाच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे…जखमींना पाटस येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शंकर वाघमारे,श्रीरंग शिंदे,पोलीस मित्र स्वप्नील कांबळे,मंगेश भगत,इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!