ना.श्री.प्राजक्तदादांकडून कै.दातिर कुटुंबाचे शाश्वत आणि भावनिक सांत्वन..

युनूस शेख

दक्ष पत्रकार संघाचे पत्रकार कै.रोहिदास दातीर यांच्या हत्येचा तपास पारदर्शक आणि कोणाच्याही दबावात होणार नाही.एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची निर्घृण हत्या होणे आणि गुन्हेगारांना साथ देणे म्हणजे मानवतेला काळीमा फासन्या सारखे आहे.त्यामुळे तनपुरे कुटुंब कधीच अशा गोष्टीला समर्थन करणार नाही,आम्ही वैयक्तिक लक्ष घालुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि दुःखंकीत कुटुंबाला न्याय व आमचा सच्चा कार्यकर्ता कै.दातीर यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. कै.रोहिदास दातीर यांचे कुटुंब हे माझे कुटुंब आहे हे मी कधीही विसरणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया ना.श्री.प्राजक्तदादा तनपुरे यांनी मयत दातिर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले असता दिली.
कै.दातीर यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक राजकीय नेत्यांना घाम फोडला परंतु त्यांची लेखणी कधीही तनपुरे कुटुंबाकडे वळली नाही.मुळात दातीर यांचेच तनपुरे कुटुंबावर नितांत निष्ठा आणि प्रेम होते.
मा.मंत्री साहेब मुंबईला असल्याने त्यांना दातीर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पाहिले दोन चार दिवस जाता आले नाही याचेच भांडवल करून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तनपुरे कुटुंबाला या खुनाच्या गुन्ह्यात बदनामी करण्याचा प्रयत्न झाला.
आपण असल्या गुन्हेगार वृत्तीला खतपाणी घालणार नाही याची खात्री आहे परंतु दातीर कुटुंबाला न्याय देणे,दहशती खाली जगणाऱ्या कुटुंबाचे मनोबल वाढवून न्यायासाठी शाश्वत करणे,गुन्हेगार कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर संपुर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.अशा तीव्र भावना तेथे उपस्थित असलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी नामदार प्राजक्तदादा यांच्यापुढे मांडल्या.यावेळी यशवंत सेना जिल्हाअध्यक्ष श्री.विजयराव तमनर,अहिल्यादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.दत्ताभाऊ खेडेकर,श्री.दादाभाऊ तमनर,श्री.भारत मतकर,श्री.श्रीकांत बाचकर,श्री.संतोष बोरुडे,कुरणवाडीचे सरपंच आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकंदरीत परिस्थिती बघता राहुरी सारख्या शांत आणि सुसंस्कृत तालुक्यात अशी दिवसा ढवळ्या हत्या होणे म्हणजे गुन्हेगारांचे वाढते मनोबल आहे.अशी घटना पुन्हा होणार नाही यासाठी अशा पशुतुल्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळने तेवढेच महत्वाचे आहे.
या अशा संवेदनशील विषयावर राजकारण करून हकनाक एखाद्याची बदनामी करून आपली राजकीय खुन्नस काढणे म्हणजे लोकाच्या घरावर जाळ फेकुन शेकत बसण्यासारखे आहे.
खुन कोणत्या कारणाने झाला?का झाला?कोणी केला?असे विविध प्रश्न आज आपल्या समोर आहेत परंतु पत्रकार कै.रोहिदास दातीर यांच्या कुटुंबापुढे कर्ता पुरुष गेल्याने उद्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आयुष्यभर राहणार हे मात्र नक्की!

कै.रोहिदास दातीर यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!