विद्युलताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमजीवी सन्मानदिन साजरा

 

जव्हार आज दिनांक -५-७-२०२२ रोजी श्रमजीवी संघटना जव्हार .
तालुक्याच्या वतीने संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मान. विद्युलताताई पंडित यांच्या २ जुलै या जन्मदिवसाच्या अवचित साधून. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मेमन हॉल जव्हार येथे श्रमजीवी सन्मान दिवस साजरा करण्यात आला .
यामध्ये प्रामुख्याने जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
तसेच संजय भल्लासाहेब , जहीर शेख पत्रकार, यांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच जव्हार तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह वह्या पुस्तके वाटप करून सन्मानित करण्यात आले.

दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मान. विद्युलताताई पंडित यांच्या २ जुलै हा जन्मदिवस श्रमजीवी संघटना दरवर्षी श्रमजीवी सन्मानदिन म्हणून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करीत असतात.
समाजातील शोषित, वंचितांच्या न्याय आणि सन्मानासाठी मान. विद्युलताताई यांनी आपले उभे आयुष्य व्यतीत केले आहे .त्यांचे कार्य आणि विचार उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणाऱ्या समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे .
त्यामुळे विद्युलताताईच्या वाढदिवसाच्या औचित्यावर आपल्या कार्याच्या सन्मान करणे आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य समजतो .
आणि म्हणून श्रमजीवी सन्मान दिनाच्या निमित्ताने आज आपला गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित तसेच जव्हार शहरातील समाजसेवक विवेक भाऊ यांच्या जवळचे सहकार्य विनीत मुकणे, हितेंद्र चोथे, जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे ,आदी मान्यवर उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे( जव्हार तालुका प्रमुख कमलाकर भोरे)( तालुका सचिव संतोष धिंडा) शहर प्रमुख जमशेद खान ,
तसेच जव्हार तालुक्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य महिला पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी चांगलेच परिश्रम घेतले।……
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!