कुरकुंभ गावाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा चिरला गळा, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

दौंड:- आलिम सय्यद

पुणे- सोलापुर महामार्गालगत दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावालगत मळद तलावाच्या समोरील शेतात आज ( दि. ५ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडलीय . याप्रकरणी आरोपी राहुल श्रीशैल निरजे ( वय २७ , रा.खटाव , जि . सांगली , सध्या रा.पुणे ) याला स्थानीक नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले असून गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या युवतीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

आरोपी युवक राहुल निरजे ची सदरची युवती ही त्याची नातेवाईक असून त्यांच्या मध्ये प्रेम संबंध असल्याची माहीती युवकाने दिली आहे . सकाळी युवतीला दुचाकी क्रमांक ( एम एच १० डी २७१० ) वरून हडपसर येथील गाडीतळावरून घेऊन सोलापूरच्या दिशेने जात असताना कुरकुंभ पासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळद तलावाच्या समोरील उसाच्या शेतात घेऊन जाताना काही ग्रामस्थांनी पाहीले.त्यानंतर काही वेळात आरोपीला पळताना पाहून ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले तर रुग्णवाहिकेच्या मदतीने युवतीला तात्काळ दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

हि घटना ही प्रेम संबंधातून झाली असल्याची प्राथमीक माहीती मिळत असुन आरोपी युवकाने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या घरच्यांनी आपल्याला मागील दोन वर्षांपासून लग्नासाठी ताटकळत ठेऊन आता काहीच प्रतीसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असल्याचे सांगीतले आहे . दरम्यान या घटनेची माहीती मिळताच कुरकुंभचे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे , अभिजीत शितोळे , इरफान शेख , सुनील भंडलकर, निसार सय्यद, जब्बार सय्यद, सुनील कोल्हे , हरिभाऊ घागरे, तसेच स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी जाऊन तत्परतेने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी युवतीस दौंड येथील रुग्णालयात दाखल केले . याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!