वीजेच्या धक्क्याने खिल्लार बैलाचा मृत्यू ,बोधेगावातील शेतकर्‍याचे अर्ध्या लाखाचे नुकसान .

बोधेगांव ता.८
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भाउसाहेब भानुदास घोरतळे यांच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या खिल्लार बैलाचा, गावठाण डिपीचा विजप्रवाह जमिनीत उतरल्याने चिटकून जागीच मृत्यू झाला.हि घटना शुक्रवार दि.८ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली.
घटनेबाबत माहिती अशी आहे की, बोधेगाव येथील गरीब कुटुंबातील शेतकरी भाउसाहेब घोरतळे यांनी महिन्यापूर्वीच उसनवारी करून एक लाखाची खिल्लार बैलजोड शेतीकामासाठी खरेदी केली होती. आज सकाळी १० च्या दरम्यान बैलांना चरण्यासाठी सोडण्यात आल्यानंतर तासाभराच्या अंतराने डिपीलगत चरत असलेला बैल अचानक जमिनीवर कोसळल्याचे पाहुन मुलगा लक्ष्मण यांने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु विजेचा शॉक लागल्याने त्यांनी एमएसईबीला फोन लावून माहिती दिली. बोधेगाव सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता पंकज मेहता यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना १०४ गट नंबर मध्ये असलेल्या बनसोडे डिपी लगतच्या घटनास्थळी कर्मचार्‍यांना पाठवून देत माहिती घेतली. वायरमन श्याम शिंदे तसेच संजु थोरात यांनी डिपी बंद करून लोखंडी पोलला चिकटलेले जंपचे वायर काढून टाकत विद्युत प्रवाह सुरळीत केला. यावेळी बोधेगाव पशुवैद्यकिय दवाखान्याचे डॉ. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन बैल मृत झाल्याचे सांगितले घटनास्थळी पवन भोंगळे, सिद्धांत घोरतळे,संजय बनसोडे, भिमा बनसोडे उपस्थित होते. शेतकरी, गरीब कुटूंबातील असल्याने शासनाने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!