
द सायन्शिया स्कुल जिरेगाव या इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थ्यांचा आषाढी बालदिंडी सोहळा..
दौंड :- आलिम सय्यद
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले , पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर ‘ , अशा विठ्ठलमय वातावरणात कुरकुंभ-जिरेगाव शिवेवर असणाऱ्या सुनिता फाउंडेशन संचलित द सायन्शिया स्कुल जिरेगाव या इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल रखुमाई , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी यांनी कुरकुंभ गावातून गावचे ग्रामदैवत श्री फिरंगाई देवी मंदिरामध्ये लहान मुलांची आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली.शाळेतील सर्व मुला – मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा, रुक्मिणी तर कोणी तुकाराम महाराज तर कोणी माऊली, बनले होते.सकाळी कुरकुंभ गावच्या मुख्य चौकापासून ते फिरंगाई देवी मंदिरा पर्यंत पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते , मुलांच्या हातात भगवे झेंडे, विना, टाळ तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता . एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा , डोक्यावर टोपी , कपाळी बुक्का ,गंध, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली , केसात गजरा , डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली , शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालविध्यार्थी शाळेत अवतरले . यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा आषाढी दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ सातपुते, सचिव श्वेता अमोल मोरे, मुख्यध्यापक अमोल मोरे, कार्याध्यक्ष धनंजय सातपुते, सदस्य विशाल जाधव तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी पालक व विद्यार्थी या आषाढी दिंडी सोहळ्याला उपस्थित होते .