पोंडीचा पाडा समोरील पुल पूर्णपणे पाण्याखाली,रेकोर्ड ब्रेक पाऊस..

ब्रेकिंग न्यूज

जव्हार तालुक्यात सतत चालू असलेले मुसळधार पावसामुळे जव्हार कडून झाप या ठिकाणी जाणारा रस्ता जव्हार पासून ७ ते ८ किमी अंतरावर असलेले पोंडीचा पाडा या गावा जवळील पूल पाण्याखाली गेल्याने झाप कवलाळा तसेच अनेक गावाचा सम्पर्क तुटलेला आहे ,
मुसळधार पावसामुळे या पुलावरून ३ ते ४ फूट वरती पाणी वाहत आहे ,

या ठिकाणी जव्हार आगारातील जव्हार कडून झाप मुक्कामी जाणारी बस अडकली आहे ,
तसेच झाप कडून जव्हार येणारी बस देखील अडकली आहे,
या दोन्ही बस मधील प्रवाश्याचे फारच हाल होत आहे,
या बसेस मध्ये आश्रम शाळेतील विध्यार्थी देखील अडकून आहे ,
दरम्यान झाप कवलाळा गावाकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे येथील आदिवासी नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,
या नदीचे नाव काळशेती असे आहे ,
या नदीत काही वर्षांपूर्वी एक २८ वर्षीय युवक वाहून गेला होता,
त्याचा मुर्तुदेह थेट वाड्या तालुक्यात मिळाला होता,
तसेच या पुलावरून दरवर्षी अनेकजण वाहून गेल्याचे घटना पावसाळ्यात घळलेली असतांना देखील या पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही ,
दरम्यान या कडे स्थानिक सदस्य लोकप्रतिनिधी यांचे लक्ष दिसून येत नाही ,
म्हणून येथिल स्थानिक आदिवासी नागरिकांची मागणी आहे ,
लवकरात लवकर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून उपाय योजना करावे।…..प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ।……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!