पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता…

रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद जव्हार २९७.६६

गेल्या ४ ते ५ दिवसापासून सूरु असलेल्या पाऊस अद्यापही कायम आहे , पावसाचे नोंदीच्या आकडा पाहिला तर जव्हार २९७.६६ मी. मि असा आहे,
यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड पडलेली आहेत,
दरम्यान पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे,
राज्यात 14 जुलै पर्यंत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे,
हा रेड अलर्ट विशेषता कोकण पश्चिम महाराष्ट्रात आहे ,
गेल्या पाच दिवसापासून जव्हार तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे,
त्यामुळे शेतींना तळ्याचे स्वरूप आलेले आहे ,
जव्हार तालुक्यातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे,
तसेच जिल्ह्यात ग्रामीण भागात जास्त पावसाने नदी नाले रस्त्यावरून वाहून चाललेले आहे ,
यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाला आहे ,
या पावसाने कहरच केला आहे ,
जव्हार पासून काही अंतरावर धानोशी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडले आहे, तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून झाडे रस्त्यावर पडून अनेक गावाचा संपर्कही तुटलेला आहे,
दरम्यान जव्हार शहरात यशवंत नगर मोर्चा येथे झाड पळून महावितरण जव्हार M ,S,E,B यांची मेन लाईन जवळ जवळ तीन ते चार पोलावरची तार तुटून रस्त्यावर पडली आहे,
जव्हार महावितरण कक्षाचे कर्मचारी मजूर जवान यांनी युद्ध पातळीवर दहा ते बारा तास सतत मेहनत करून आता शहरात सुरळीतपणे लाईट चालू झाली आहे,
दरम्यान पावसामध्ये महावितरण जव्हार एमएसईबी मध्ये काम करणारे कर्मचारी ,
मजूर भर पावसात वीस ते पंचवीस फूट उंच लोखंडी पोलावर जीव मुठीत घेऊन माकडासारखे रिपेरिंग करण्यासाठी चडत असतात कधी कोण पोलावरून पडणार खाली याची काही एक गॅरंटी नसते ,
म्हणून मोठ्या शहरात मुंबई, नाशिक, पुणे ,या ठिकाणी टेम्पोद्वारे महावितरण कक्षाचा एमएस ई बी चा काम केला जातो तसे
टेम्पो व्हॅन जव्हार तालुक्यात मिळावे,
जेणेकरून मजुरांच्या जीवाचा जो खेळ ग्रामीण भागात चालू आहे ,
तो तरी बंद होईल।…….. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!