मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-कोतीमाळ येथील पूल पाण्याखाली, ३ दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला.

जव्हार:-पालघर जिल्हा मध्ये सर्व ठिकाणी सतत मुसळधार पावसामुळे अनेल पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद झाले आहे.

जव्हार तालुक्यातील तिलोंडा गावाकडे जाणार्या रस्त्यावर पिंपळशेत-कोतीमाळ गावाजवळ एक छोटा पूल असून गेल्या १० वर्षापासून या पुलाची उंची वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम विभागाने प्रयत्न केले नाहीत.
त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर येऊन हा पूल पाण्याखाली जातो .
व धोकादायक बनतो. या भागात आश्रमशाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र असून अनेक गावे आहेत.
गेल्या आठवडा भरापासुन या भागात मुसळधार पाऊस सुरू असुन पिंपळशेत,हेदीचापाडा,ओझर, चांभारशेत,तासुपाडा,
भुसारपाडा,तीलोंडा,कोतीमाळ,पागीपाडा,वडपाडा,खोमारपाडा,खरोडा, हुंबरन,जांभुळपाडा, अशाया सर्व गावांचा संपर्क हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे तुटला आहे. पिंपळशेत-कोतीमाळ गावाकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे येथील ग्रामीण जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
अति आवश्यक सेवा ठप होते, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांना याचा अधिक फटका बसतो.
नदी-नाल्याचे पाणी या पुलावरून जोरात वाहत असल्यामुळे तसेच. या पुलावरून पावसाळ्यात अनेकजन वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
गेल्या वीस वर्षापासून ही समस्या उद्भवत असताना देखील या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही.
तसेच पुलाला कठडे देखील बांधण्यात आले नाहीत.
त्यामुळे या पुलावर पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत आहेत. या दुर्घटना थांबविण्यासाठी पुलाचे नुतनीकरण करुन त्याला कठडे बांधावे,
अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।…..प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!