
राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे प्रलांवित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे बैठकीचे आयोजन
डहाणू प्रतिनिधी –शिव प्रसाद कांबळे
तातडीने प्रश्न मार्गी लावून ,अहवाल सादर करण्याचे आदेश
: गोरगरीब जनतेचे प्रश्न घेऊन राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने वेळोवेळी आंदोलने , निवेदने ,धरणे करूनही जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे ,शेतकऱ्यांचे , कामगारांचे ,आदिवासी जनतेचे ,दलित वस्तीचे , जनतेच्या आरोग्याशी संबंधित व जिल्ह्याच्या विकासाशी निगडित असलेले अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याने आघाडीच्या वतीने अनेक वेळेस स्मरण पत्रके व निवेदने देऊनही आघाडीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आली असल्याने त्याची तक्रार राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आदरणीय नामदार नानाभाऊ पटोळे साहेब यांना केली असता , पालघर जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बुधवार दिनांक 20 जुलै 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता अपर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे साहेब , मुख्यालय जव्हार यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हाधिकारी किरण महाजन साहेब (सामान्य विभाग) व उपजिल्हाधिकारी जाधवर साहेब (RDC) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीस पँथर्सच्या 7 प्रमुख पदाधिकारी यांना परवानगी देण्यात येईल म्हणून अगोदरच जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदर बैठकीत जिल्ह्यातील गोर गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न , शेतकरी , कामगारांचे प्रश्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , पथराळी गावाच्या जमिनीचा प्रश्न , छत्रपती शिवाजी महाराज नगर (सुंदरम) मुख्य रस्त्यावरील झालेले बेकायदेशीर अतिक्रमण , पानेरी प्रदूषणाचा प्रश्न , दलित वस्ती निधीतील भ्रष्टाचार , दहिसर तर्फ़े तारापूर व उसरणी गावातील स्मशान भूमीचे प्रश्न , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातुन संस्थांना दिलेल्या योजनेतील निधीमध्ये संस्थांकडून झालेला अपहार , बोईसर येथील कब्रस्तानाचे प्रश्न , पाम गावातील बुद्ध विहाराचा प्रश्न , प्रदूषणासंबंधी प्रलंबित प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील प्रलंबित प्रश्न, चटई कामगारांचे प्रश्न , सुरक्षा ररक्षकांचे प्रश्न , जव्हार मोखाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील बेकायदेशीर अतिक्रमणे व भ्रष्टाचाराचे प्रलंबित प्रश्न , जव्हार नागरपरिषदेतील प्रश्न , मोखाडा नगरपंचायत मधील प्रलंबित प्रश्न तसेच विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी यांना अपर जिल्हाधिकारी साहेब पालघर यांनी जलदगतीने कारवाई करण्यात येऊन त्याचे अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले. प्रलांवित प्रश्न तातडीने मार्गी लावा अन्यथा जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील असा इशारा पँथर्सच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत , जिल्हाध्यक्ष विनायक जाधव , पालघर जिल्हा संघटक लहानु डोबा , महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई मोरे , जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे , जव्हार मोखाडा संपर्क प्रमुख कमलाकर माळी , पालघर जिल्हा युवा अध्यक्ष हितेश कुर्ले , पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत , डहाणू तालुका अध्यक्ष जीभाऊ अहिरे , मोखाडा तालूका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, डहाणू तालुका उपाध्यक्ष सिराज शेख , डहाणू तालुका सचिव सुनील भांगे , डहाणू तालुका महिला अध्यक्षा वहिदा शेख , डहाणू तालुका उपाध्यक्षा शीतल ठाकरे , पालघर तालुका उपाध्यक्षा शालिनी वानखेडे , व चर्मकार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.