मोखाडा तालुक्यात रयत शिक्षण संस्थेचे जाळे पसरले..

दी.२१-७-२०२२मोखाडा तालुक्यात रयत शिक्षण संस्थेचे जाळे पसरले असुन मोखाडा येथे महाविद्यालय, हायस्कूल तसेच बऱ्याअश्या आश्रमशाळा देखील आहेत.
मात्र अनेक ठीकाणी शिक्षकांची कमतरता आहे .
जुन्या ईमारती,अपुरी जागा तसेच मोखाडा येथे नव्याने सुरू केलेल्या ईंग्लीश मिडीयम शाळेसाठी मान्यता घेणे.
आणि गुणवत्ता दर्जा कायमस्वरूपी मुख्याध्यापक देणे.
अशा अनेक समस्यां घेवून मोखाडा तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळीनी काल सातारा येथील रयत शिक्षण संस्थाच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील सर यांची भेट घेतली .
यावेळी सर्वच बांबीवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मोखाडा हायस्कूल ला नवीन इमारत वगैरे हे प्रश्न आगामी काळात लवकरच सुटणार आहेत.
यामुळे तालुक्यातील एखाद्या समस्येवर सर्वपक्षीय मंडळी एकत्र येणे हे काहि मोखाडा तालुक्याला नवीन नाही .
याबाबत समाधान व्यक्त होत आहे . यावेळी आपला माणूस आमदार सुनिल भाऊ भुसारा,जि.प . सदस्य प्रकाश निकम, स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन नरेंद्र पाटील,नगराध्यक्ष अमोल पाटील,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष चोथे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर आदि उपस्थित होते।…….प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!