पांढरेवाडी येथे मोहरम ( ताबूत )भावुक वातावरणात विसर्जन.

दौंड :- आलिम सय्यद,

हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पांढरेवाडी ( ता. दौंड ) गावामध्ये मोहरम साजरा करण्यात आला. मोहरम निमित्ताने मुस्लिम बांधवांनी दहा दिवस अगोदर तयारी करून भव्य – दिव्य ताबूत , (सवाऱ्या) उभारले . पांढरेवाडी सय्यदवस्ती येथे बनवण्यात आलेल्या ताबूत, सवाऱ्यांची वस्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती . पांढरेवाडी गावातील जगतापवस्ती, शितोळेवस्ती, निंबाळकरवस्ती, जाधववस्ती ,गावातील हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाले होते . दरम्यान कुरकुंभ येथे औद्योगिक वासहत असल्याने तेथील काही कामगार परप्रांतीय व गावातील हिंदू- मुस्लिम भाविकांनी ताबूत , सवाऱ्यांची दर्शन घेण्यासाठी गर्दी केली व सायंकाळी ताबुताच्या भव्य मिरवणुकीनंतर भावुक वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी कुरकुंभ पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पांढरेवाडी गावचे पोलीस पाटील विलास येचकर, इस्माईल सय्यद, रशीद सय्यद ,अकबर सय्यद, आलिम सय्यद, शरीफ सय्यद, सलीम सय्यद, समीर शेख, ताजु सय्यद, अल्ताप सय्यद , अमीर शेख , इकबाल सय्यद , शिवाजी येचकर, सहभागी झाले होते , हजरत मोहंमंद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन, हुसेन आणि त्यांचे ७२ अनुयायी यांनी सत्यासाठी व शांततेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली यानिमित्त त्यांच्या बलिदानाचे प्रतीक असलेले मोहरम साजरा केला जात असल्याचे सय्यद परिवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!