कुरकुंभ एम.आय.डी.सी. रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी सुनील ठोंबरे तसेच सचिव पदी शशिकांत पाटील…

दौंड:- आलिम सय्यद,

दौड तालुक्यातील रोटरी क्लब आँफ कुरकुंभ एम.आय.डि.सी. च्या अध्यक्षपदी सुनिल ठोंबरे यांची निवड करण्यात आली.
मंगळवार (ता.२६ जुलै) रोजी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील
एम. आय. डी. सी. कार्यालय येथे
रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम. आय. डी. सी. यांची बैठक घेण्यात आली. यावेळी रोटरीचे प्रांतपाल मंजु फडके (DGE) सहायक प्रांतपाल गणेश काळभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी
अध्यक्ष म्हणुन सुनील ठोंबरे यांची
तसेच सचिव म्हणुन शशिकांत पाटील आणि इतरपदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी माजी अध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी गतवषीच्या काळातील सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडुन नविन अध्यक्ष
आणि पदाधिकाऱ्यांना भविष्यातील कारकिदीस शुभेच्छा
दिल्या.
रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक कामे केली असून चालू वषीॅ नव-नविन कार्यक्रम राबवणार असून यामधे रत्कदान शिबिर व गरजू विद्यार्थीना शालेय वस्तुचे वाटप करणे. असे अनेक कार्यक्रम घेणार असल्याचे नव्वचित अध्यक्ष सुनील ठोंबरे यांनी या प्रसंगी सांगितले.


यावेळी दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. राजेश दाते, यांच्या सह रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम. आय. डी. सी. चे पदाधिकारी व काही सदस्य उपस्थित होते. त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ पाटस चे विश्वास अवचट, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष गांधी साहेब, रोटरी क्लब ऑफ अकलुज च्या अध्यक्षा स्वाती चंकेश्वर, सिंह गड रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल कागवडे यावेळी उपस्थिति होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!