“द सायन्शिआ स्कूल जिरेगाव येथे” आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा..”

दौंड:- आलिम सय्यद

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे
स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सुनिता फाऊंडेशन संचलित द सायन्शिआ स्कूल जिरेगांव या ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्वतंत्र सेनानीच्या वेशभूषेमध्ये आपली कला सादर केली. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांनी , भाषण,गायन, कवायत, मनोरे , याचे सादरीकरण केले.

भारत देश जगाला एक आदर्श देश आहे या देशामध्ये अनेक भाषा अनेक वेश अनेक जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात व सर्व जगाला शांततेचा संदेश देतात तसेच भारत देश सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी केले”. या कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी नवनाथ सातपुते ,धनंजय सातपुते, दिलीप सातपुते, श्वेता मोरे, विशाल जाधव, चंद्रकांत जाधव, सचिन खेत्रे, सचिन जाधव, तसेच शिक्षक वैशाली शितोळे,अफसाना शेख, रक्षंदा शितोळे, सेवक उमाजी चव्हाण, काजल चव्हाण व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पालक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!