पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार तर तीन जण जखमी..

दौंड:-आलिम सय्यद

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावाच्या हद्दीत दोन दुचाकींच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन तरुण ठार तर तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरेवाडी गावच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी रात्री ०९:१५ च्या सुमारास पुणे बाजूला जाणाऱ्या सेवा रस्त्याला फिरंगाई टेक्स्टाईल च्या काही अंतरापुढे भरधाव वेगाने एच एफ डिलक्स व हिरो स्प्लेनडर या सदर दोन्ही दुचाकींना नंबर नाही . या दोन दुचाकींची समोरा समोर धडक बसून अपघात झाला या अपघातात गणेश सतिश खंडाळे ( वय १८ रा. भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे ) व रामू विजयकुमार दीक्षित ( वय २३ सध्या रा. कुरकुंभ, मूळ राहणार दौलतपुर ता. हैदरगड, जि. बारबंगी राज्य उत्तरप्रदेश,) या तरुणांना गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला तर गणेश सचिन सोनवणे, ( वय १७ रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) प्रसाद विजय सोनवणे, ( वय 12 रा. कुरकुंभ- पांढरेवाडी) सुमित संतोष कुचेकर ( वय १६ रा. कौठडी रोड कुरकुंभ ता. दौंड) सदरचे तीन जण जखमी झाले आहेत . सदर मयत रामू दीक्षित हा भरघाव दुचाकी चालवून मयत गणेश खंडाळे याच्या दुचाकीला जोरात धडक देवून तीन जणांना गंभीर दुखापतीस व मयत गणेश खंडाळे व स्वताच मरणास कारणीभूत झाला आल्याने रामू दुक्षितच्या विरोधात मंगेश सतीश खंडाळे रा.भवानी नगर ता. इंदापूर जि. पुणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सदरचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!