
शेवगाव तहसील कार्यालयात दिव्यांगाकरिता सोई सुविधेचा अभाव : चाँद शेख
सावली दिव्यांग संघटना करणार तीव्र आंदोलन
तहसील कार्यालय शेवगाव मध्ये दिव्यांग बांधवाकरिता सोई सुविधेचा अभाव असल्याचे सावली दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोई सुविधा उपलब्ध नसल्याचे अनेक दिव्यांग बांधवांच्या संघटनेकडे तक्रारी आल्या आहेत.
त्यानुसार सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे मागण्या सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चाँद शेख यांनी नायब तहसिलदार मयूर बेरड साहेब तहसील प्रशासनाकडे निवेदन देऊन मांडल्या आहेत. निवेदन देतांना सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,दारूबंदी आंदोलन समिती अहमदनगरचे अमोल घोलप,बोधेगाव ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, शिवा संघटना बोधेगाव अध्यक्ष दीपक तागडे,बाबाभाई शेख,सेतू समन्वयक असिफ शेख,अशोक सौदागर,उपस्थित होते.
1) दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करावी
2)दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी तहसील कार्यालयात खुर्ची किंवा बाकाची व्यवस्था करावी
3)तहसील कार्यालयात शौचालयची सुविधा आहे परंतु दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कमोड शौचालय ची व्यवस्था करावी
4)शौचालय साठी पाण्याची व्यवस्था करावी
5)दिव्यांग बांधवांसह इतर नागरिक कामानिमित्त तहसील कार्यालयात येतात परंतु त्यांना पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे दररोज स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
6)दिव्यांग बांधवांचे रेशनकार्ड ऑनलाईन करून धान्य चालू करावे
काही मागण्या या आम्हीं यापूर्वी देखील केल्या होत्या परंतु फक्त आश्वासन मिळाले होते. सदर मागण्या 15 दिवसात पूर्ण केल्या नाही तर 12 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालय शेवगाव समोर सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,संघटक खलील शेख,कार्याध्यक्ष मनोहर मराठे,सह संघटक अनिल विघ्ने,सोशललमीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख,शहर उपाध्यक्ष सुनील वाळके,शहर सचिव गणेश तमानके,गणेश महाजन,महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भालेकर,महिला तालुका अध्यक्षा सोनाली चेडे,महिला शहर अध्यक्षा चंद्रकला चव्हाण, तसेच तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव व तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
चौकट
तहसील प्रशासनाने दिव्यांग थट्टा मांडली आहे.फक्त आश्वासन देयचे आणि कार्यवाही करायची नाही.परंतु आता शासनाच्या नियमानुसार दिव्यांग बांधवांना तसेच इतर नागरिकांना देखील सोई सुविधा मिळायला पाहिजे.आंदोलन दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी तहसीलदार साहेब जबाबदार राहतील.
चाँद कादर शेख
अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव