आईसाहेब मित्र मंडळ व रोटरी क्लब कुरकुंभ MIDC यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन..

दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद.

गणेशउत्सवानिमित्त कुरकुंभ येथील आईसाहेब मित्र मंडळ कुरकुंभ व रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ midc यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते पुंजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी आईसाहेब मित्र मंडळ हे १४ वर्षांपासून गणपती उत्सव साजरा करत आहे. या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शिबिरे, घेत असतात. दरवर्षी गणेशउत्सवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी सांगितले.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ MIDC चे अध्यक्ष सुनील ठोंबरे, माजी उपसरपंच संजय जाधव, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ MIDC चे माजी अध्यक्ष फुलचंद ढोरे, बाबा गायकवाड, तसेच रक्तदाते व आईसाहेब मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्तिथ होते. यावेळी सत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी रक्त दान केले असल्याची माहिती आईसाहेब मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!