अन्नधान्य व इतर मागण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचे आंदोलन..

अन्नधान्य व इतर मागण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचे आंदोलन

तहसील कार्यालय शेवगाव मध्ये दिव्यांग बांधवाकरिता सोई सुविधेचा अभाव असल्याने तसेच तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध नसल्याचे अनेक दिव्यांग बांधवांच्या संघटनेकडे तक्रारी आल्या होत्या याची दखल घेवुन सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने शेवगाव तहसील येथे सोमवारी आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली उपोषणा दरम्यान दिव्यांगांच्या भावना तीव्र झाल्याने तहसील कार्यालय घोषणाच्या आवाजाने दणाणुन गेले
दिव्यांगांच्या मागण्या प्रामुख्याने

1) दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करावी
2)दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी तहसील कार्यालयात खुर्ची किंवा बाकाची व्यवस्था करावी
3)तहसील कार्यालयात शौचालयची सुविधा आहे परंतु दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कमोड शौचालय ची व्यवस्था करावी
4)शौचालय साठी पाण्याची व्यवस्था करावी
5)दिव्यांग बांधवांसह इतर नागरिक कामानिमित्त तहसील कार्यालयात येतात परंतु त्यांना पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे दररोज स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
6)दिव्यांग बांधवांचे रेशनकार्ड ऑनलाईन करून धान्य चालू करावे
सदर वरील सहा पैकी काही मागण्या या आम्हीं यापूर्वी देखील केल्या होत्या परंतु फक्त आश्वासन मिळाले होते

सदर मागण्या बाबत निवेदन देवुनही कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार तहसील कार्यालयाकडुन करण्यात आला नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला असुन जर मागण्या पुर्ण करण्यात आल्या नाही तर शेवटच्या टप्यापर्यन्त उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सावलीचे चांद शेख यांनी सांगीतले
आंदोलन दरम्यान —–
उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!