बारामती येथे शेतकऱ्यांसाठी मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रम संपन्न..

बारामती तालुक्यामध्ये 25 गावांमध्ये फसल विमा पाठशाळांचे आयोजन_

पुणे:-आलिम सय्यद

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारी विमा या अंतर्गत १ सप्टेंबर 2022 पासून *मेरी पॉलिसी मेरे हाथ* या अंतर्गत शेतकऱ्यांना गावात जाऊन फळ पिक विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावातील शेतकऱ्यांना फळ पिक विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले.भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावापासून पॉलिसी वितरणाचे शुभारंभ करण्यात आला यावेळी बारामती मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे

सांख्यिकी अधिकारी संतोष मोरे कृषी अधिकारी श्री.घाडगे, फळपिक विमा तालुका समन्वयक प्रतीक कदम यांच्या हस्ते विमा पावत्यांचे वाटप तालुका कृषी अधिकारी कार्यालय बारामती येथे करण्यात आले या पूणर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अभाधित राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे असा हेतू असल्याचे प्रतिक कदम यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!