जव्हार श्रमजीवी संघटनेच्या मदतीने हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकिस आली आहे.. 

गरीब आदिवासींच्या गैरफायदा घेऊन जव्हार शहरातील दोन अल्पवयीन मुलीची कवळी मोलात खरेदी करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या मदतीने व पाठपुराव्याने उघडकीस आला आहे .
जव्हार येथील धारणहट्टी येथील अल्पवयीन दोन मुलींचे १२ हजार रुपये व एक मेढे देऊन खरेदी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे .
२० सप्टेंबर २०२२ बाल वेठबिगारीच्या जाळ्यात पालघर ,ठाणे, नाशिक , येथील आदिवासी गरीब कातकरी समाजातील मुली मुले अडकल्याचे मोठे रॅकेट समोर आले आहे .
जव्हार तालुक्यातील धारणहट्टी येथील नरेश भोईर यांच्या दोन अल्पवयीन मुलींना मेढ्या चारण्यासाठी अवघ्या १२ हजार रुपये व एक मेंढी देण्याचे कबूल करून मेंढपाळ राबवत होता .
काही दिवसांपूर्वी दोघी मुलीतील एक मुलगी मालकांनी जव्हारला परस्पर आणून सोडून दिली .
तर दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे .
दरम्यान नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उबाडे शिवारातील गौरी आगिवले या दहा वर्षीय बालिकेच्या संशयास्पद मृत्यूने बाल बेठबिगारी साठी मुलांची खरेदी करणारे रॅकेट उघडकीस आले आहे .
त्यानंतर पालघर ठाणे ,नाशिक ,तसेच इतर अनेक जिल्ह्यात प्रशासनाने श्रमजीवी संघटनेच्या मदतीने या अशाप्रकारे सर्व मुला-मुलींचे शोध मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात सुरुवात केली आहे .
दरम्यान जव्हार येथील एक मुलगी तसेच भिवंडी येथील दोन मुलं यांना श्रमजीवी संघटनेने या जाळ्यातून मुक्त केले आहे .
दरम्यान या प्रकरणात भिवंडी , ठाणे, पालघर ,नाशिक ,अशा वेगवेगळ्या ठिकाणी संबंधितावर गुन्हे दाखल केलेले आहेत .
तसेच श्रमजीवी संघटनेच्या या कार्यास संपूर्ण पालघर जिल्ह्यात कौतुक होत आहे ।… प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!