
जव्हारच्या ऐतीहासिक व शाही उरुसात नगरपरिषदेकडून सोयी सुविधांचा अभाव
औलिया पीर शाह सद्रोद्दीन बद्रोद्दीन हूसैनी चिश्ती यांचा ५७० वा उरूस दिनांक १६ सप्टेबर ते १८ सप्टेबर २०२२ या कालावधीत संपन्न झाला.
खरं तर करोणाचे निर्बंध उठल्यानंतर दोन वर्षांनी हा उरूस साजरा होत असताना नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती .
उरुसासाठी खूप मोठ्या संख्येत विविध प्रकारची दुकाने शहरात आली होती.
तसेच जिमखाना शेजारील मैदानावर आकाश पाळणेही आले होते.
या मैदानावर आकाश पाळण्यासाठी नगर पालिकेकडून २ लाख ६० हजाराची निविदा काढण्यात आली होती.
खेदाची बाब अशी की,एवढी मोठी रक्कम घेवून ही प्रशासनाकडून या मैदानावरील
साफ सफाईकडे दुर्लक्ष होते.
मैदानावर असलेली दलदल,झाकण नसलेले गटारीचे चेंबर व दुर्गंधीयुक्त परिसरामूळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
आकाश पाळण्यात जाण्यासाठी नागरिकांना चिखल तुडवून जावे लागले.
तसेच उरूसा दरम्यान इतरही मूलभूत सुविधांचा अभाव दिसून आला.
पर्यटनाचा ” ब “दर्जा प्राप्त झालेल्या पालिकेकडून नागरिकांसाठी फिरते शौचालय , बाथरूम , किंवा तत्सम व्यवस्था केली गेली नव्हती.
परिणामी ऊरुसासाठी आलेल्या नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले.
तसेच शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दोनच महिन्यात दुरावस्था झालेली दिसून येत आहे.
पाचबत्ती परीसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे कितीतरी अपघात घडले आहेत.
परंतु, या कडे नगराध्यक्ष महोदयांचा लक्ष का गेले नाही .
असा संतप्त सवाल त्रस्त नागरिक करीत आहे.
तसेच उरुसासाठी आलेल्या गोर- गरीब दुकानदाराला भर पावसात आपल्या दुकानाची शेड उभारताना रस्त्यावर बांबू गाडणे अनिवार्य झाले होते.
परंतु,या गोष्टीचे नगराध्यक्ष महोदयांना पोटशूळ झाले. त्यावेळी नगराध्यक्ष महोदयांनी पालिकेतील कर्मचाऱ्यांना बोलावून काही दुकानदारांना कायदेशीर धाक दाखवला .
व रस्त्याच्या भरपाई पोटी त्या दुकानदारांकडून जास्त रकमेची मागणी केली.
नगराध्यक्ष महोदयाकडून कडून झालेल्या त्रासाला कंटाळून दुकानदार परत जात होते.
या प्रकारामुळे उरसाला गालबोट लागायची वेळ आली होती .दरम्यान उरूस कमिटी व काही समाजसेवकांना ही बाब समजली त्यांनी त्वरित मुख्याधिकारी मानिनी कांबले मॅडम यांच्याकडे धाव घेतली . मुख्याधिकारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ कमिटीची व दुकानदाराची समजूत काढून निर्माण झालेला पेच संपुष्टात आणला.
त्याच प्रमाणे
दरवर्षी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी नगरपरिषदे कडून
जुना राजवाड्यात डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याचा ढीग हा महाराजांना दिसू नये म्हणून तात्पुरती साफसफाई करून पडदा मारण्यात आला होता.
आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थीत होतो की, हे सर्व करण्यासाठी
नगर परिषदेकडे पैसे आहेत .परंतु वर्षभर नागरिकांना कचऱ्यापासून होणारा नाहक त्रास हे नगरपरिषदेला दिसत नाही का ? याकडे नगरपरिषद प्रशासन लक्ष देणार का?
या सर्व विषयाची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात व जव्हार शहरात सर्व त्रस्त नागरिकांमध्ये होत आहे .
प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।………..