जव्हार शहरात दुःखत घटना गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या..

जव्हार ब्रेकिंग न्यूज

दुःखत घटना गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
आज दी .१४-१०-२०२२ रोजी जव्हार पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जांभळीचामाळ परिसरातील
२० ते २२ वर्षीय तरुण राहुल सिताराम सापटा याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान ,या दुख:द घटनेबाबत अधिकृत माहित अशी की, जांभळीचामाळ परिसरातील या तरूणाने दुपारी चारच्या सुमारास जव्हार नगरपरिषद क्षेत्रातील जयसागर जलाशयाच्या मधोमध असलेल्या झाडाला फास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे .
दरम्यान, घटनास्थळी जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने राहुल याच्या मृतदेहास जलाशयाच्या काठावर आणण्यात आले .
मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही .
सदर दुखद घटनेबाबत परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
सदर आत्महत्ये बाबत जव्हार पोलीस ठाण्या मार्फत पुढील चौकशी चालू आहे .
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी ,जव्हार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!