जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांचे पालघर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून विशेष सत्कार..

जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांचे पालघर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून विशेष सत्कार..
———————————————-
जव्हार तालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री आप्पासाहेब लेंगरे .
यांनी जव्हार येथे पदभार घेतल्यापासून विविध प्रकारच्या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे .
तसेच आतापर्यंत कितीतरी प्रलंबित गुन्ह्याचा तपास अतिशय पारदर्शकपणे केलेला आहे .
मागील आठवड्यात आप्पासाहेब लेंगरे यांनी एका अशाच प्रकारच्या चोरीचा गुन्ह्याच्या तपासात फार मोठी कामगिरी केलेली आहे .
दरम्यान पाच आरोपींना तब्बल १६ लाखांच्या मुद्देमाला सह जेरबंद करण्यात मोठे यश संपादन केले
सदर आरोपीवर भारतीय दंड विधान विधान संहितेच्या कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्हेगाराविरोधात पुढील तपास चालू आहे .
या विशेष कामाची व अशा प्रकारांच्या अनेक विशेष कामाची दखल पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे .
दिनांक– ११– १० -२०२२ रोजी आप्पासाहेब लेंगरे यांना या सदरच्या प्रशसनिय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
तसेच पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या या प्रशासनिय कामगिरीबद्दल पालघर जिल्हा तसेच जव्हार तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक कौतुक करत आहे ।….
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!