दि. जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित

जव्हार दिनांक १४-१०-२०२२ जव्हार अर्बन बँकेची निवडणूक घोषित झाली असून .
या निवडणुकीच्या कार्यक्रम असा असेल .
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिनांक १२-१०२०२२ ते १७-१०२०२२ हा कालावधी दिलेला आहे .
तसेच यासाठी जव्हार को-ऑपरेटिव्ह बँकेची मुख्य शाखा जव्हार येथे उमेदवारास नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील .
तसेच उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक१८-१०२०२२- रोजी ११ चे दरम्यान चालू होईल .
आणि नंतर वैद्य नामनिर्देशन पत्राची सूची दिनांक १९-१०-२०२२ रोजी मुख्य निवडणूक कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात येईल .
तसेच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक १९-१०-२०२२ ते २-११-२०२२ असा असेल . उमेदवारास या कालावधीत अर्ज मागे घेण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधी दिला आहे . त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यामार्फत निशाणीचे वाटप केले जाईल ..
दिनांक३-११-२०२२- रोजी अंतिम यादी चे प्रकाशन सकाळी ११ चे दरम्यान केले जाईल .
तसेच मतदान दिनांक १३-११-२०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होईल .
दिनांक १४-११-२०२२ – मतमोजणी होईल .
त्यानंतर लगेचच निकाल घोषित केला जाईल .
दरम्यान या निवडणुकीच्या प्रक्रियेस मोठ्या प्रमाणात वेग आला असूनजवळ जवळ ७० च्या पुढे नामनिर्देशन पत्र उचलण्यात आले आहे .
दिनांक १२-१०-२०२२ ते १४-१०-२०२२ या कालावधीत आतापर्यंत २० उमेदवारांचे नामनिर्देशन बँकेच्या निवडणूक मुख्यालयात जमा केलेले आहे।…..
————- —————– —————
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ।…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!