निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू यांची धडक कारवाई..

डहाणू

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू यांना 18 ऑक्टोंबर रोजी खात्रीलायक बातमी नुसार दीपावलीच्या सनाकरिता लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मध्य तस्करीवर आळा घालण्या कामी विभागाकडून दिवस रात्र गस्त व करडी नजर ठेवली असून त्या अनुषंगाने 18 ऑक्टोंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू विभागाचे निरीक्षक श्री महेश धनशेट्टी व त्यांच्या टीमने विभागात सापळा रचून मौजे दाभेरी तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी व होंडा शाईन कंपनीची दुचाकी या गाडीची झडती घेऊन पर राज्यातील अवैध मद्य दहा लाख तेहतीस हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे पर राज्यातून दारू तस्करी करणाऱ्या चे चांगलेच धाबे दणाणले आहेत या कारवाईमुळे सर्वत्र परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे सदर गुन्ह्याचा तपास श्री महेश धनशेट्टी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू हे करीत आहेत

डहाणू प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!