जव्हार पोलीस निरीक्षक पदी सुधीर संखे यांची निवड 

जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांची अन्य ठिकाणी बदली झाली आहे .
त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक पदी सुधीर संखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
सुधीर संखे हे या पूर्वी पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते .
तिथे त्यांनी अनेक गुन्हेगारांना खाकी दाखवून कर्तव्यदक्ष कामगिरी बजावून जेरबंद केले ,
तसेच जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांची जव्हार तालुक्यामध्ये ओळख म्हणजे .
पैसे द्या आणि काहीही करा ,पैशाची भूक सारखी होती त्यांना ,
अशी आप्पा साहेबांची ओळख होती जव्हार शहरांमध्ये ,
अवैध धंदे त्यांच्या आशीर्वादाने चालायचे अवैध धंदेवाले माफिया बरोबर त्यांचे घनिष्ट असायचे ,
व अशा लोकांच्या कार्यक्रमात नेहमीच आप्पासाहेब दिसायचे ,
तसेच तालुक्यातील लोकसेवा करणारे चांगले कार्य करणारे नागरिक म्हणजेच ज्यांच्याकडे पैसे नाही असेलोक काही काम घेऊन लेंगेरे यांच्याकडे जायचे तर अशा लोकांचे काम होत नसायचे , कारण त्यांच्या कडे पैसा नाही ,
अशा लोकांना वारंवार पोलीस स्टेशन येथे चकरा मारूनही आप्पासाहेब लेंगरे यांच्याकडे दुर्लक्ष करायचे ,
अशी ओळख आप्पासाहेब लेंगरे यांची होती ,
तसेच जव्हार सीमे लगत खानवेल, सेलवास, दादरा नगर, दमन ,या ठिकाणावरून जव्हार येथे दारू , गुटखा ,तसेच अनेक प्रकारचे अमली पदार्थाची तस्करी होत असते ,
ही सीमेलगतची तस्करी सूत्रांच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या संगनमताने होत असते ,
दरम्यान आता नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुधीर संखे , अवैध धंदे दोन नंबरचे अमली पदार्थाचे तस्करी रोखू शकतील का ,
तसेच आपली कामगिरी व आपले कर्तव्य कसे बजावतील
याकडे सर्व जव्हार तालुक्यातील पोलिसांवर विश्वास ठेवणारे गोरगरीब सामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे । …..
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!