स्वराज्य ढोल ताशा पथक जव्हार वादकांनी साजरी केली आगळी वेगळी दिवाळी

स्वराज्य ढोल ताशा पथक जव्हार या ठिकाणी पथकाने दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत . स्वराज्य ढोल ताशा पथक जव्हार तालुक्यामध्ये तसेच पालघर जिल्ह्यात एक नावाजलेला पथक आहे .
स्वराज्य पथकातील सर्व वादक स्वतः वादन करून मिळणाऱ्या मानधनातून विविध प्रकारचे वर्षभर कार्यक्रम करत असतात .
यामध्ये प्रामुख्याने किल्ले दर्शन , रांगोळी स्पर्धा , आकाश कंदील स्पर्धा , तसेच गेल्या दोन वर्षात कोविड काळामध्ये रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम राबवले आहेत .
दरम्यान यावर्षी या पथकामार्फत आदिवासी बहुल गाव कापरीचा पाडा येथे कष्टकरी गरजू लहान मुलांना फराळाचे वाटप करून त्यासोबत पथकातील ग्रुप मधील सर्वांनी एक आगळीवेगळी दिवाळी साजरी केली आहे .
स्वराज्य ढोल ताशा पथक या पथकाचे या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कुणाल आंभिरे हे नेहमीच पथकामार्फत येणारा मानधनातून समाजकार्य करत असतात .
स्वराज्य ढोल ताशा पथक यांच्या या कार्यास जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ।……
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!