सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे यांच्याकडून दिपावलीनिमित्त दिव्यांग महिलांना साडी चोळी व मिठाई वाटप

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील पाटस येथे दिपावली लक्ष्मी पूजन व भाऊबीज निमित्त दिव्यांगांना मिठाई व दिव्यांग महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. पाटस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे यांनी गरीब, वंचित दिव्यांगांच्या घरी देखील दिवाळी साजरी व्हावी व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा या सामाजिक भावनेतून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या सहयोगाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला. पाटस येथील श्री नागेश्वर मंदिरात सोमवार दि. २४ रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुमारे १५० दिव्यांग व्यक्तींना साडी चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या दिव्यांग व्यक्तींना. कार्यक्रमात सहभागी होता आले नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटवस्तू देण्यात आली. सदर उपक्रम कामी अशोक नागरगोजे यांना कुरकुंभ येथील हार्मोनी कंपनीचे व्यवस्थापक संजय साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे हे नेहमीच काहीनाकाही सामाजिक उपक्रम राबवत असतात. ते आपल्या माफक पगारातून बचत करून गोरगरिबांना मदत करत असतात. ते व त्यांचे सहकारी वाढदिवस साजरा न करता गरजूंना भेटवस्तू देत असतात. आपल्याला मिळालेल्या जन्माचे सार्थक व्हावे, आपल्या हातून दिनदुबळ्यांची सेवा घडावी, इतरांप्रमाणे त्योच्या घरी सणसूद साजरे व्हावेत, अशी उदात्त भावना उराशी बाळगून व कोणत्याही प्रकारची अपेक्षा वा स्वार्थ न ठेवता स्वखर्चाने ते समाजसेवा करत आहेत. याच हेतूने त्यांनी दिपावलीच्या सणात अन्य सामाजिक उपक्रमापेक्षा समाजात राहूनही वंचित राहिलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यासाठी मिठाई व साडी चोळी वाटपाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना नागरगोजे म्हणाले की, आयुष्यात माणूस पैसा कमावतो, श्रीमंत होतो परंतु शेवटी जाताना सर्वकाही सोडून जातो. तेव्हा जीवन आहे तोपर्यंत आपल्याला इतरांसाठी जितके चांगले करता येईल तितके करावे. तर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दौंड तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देत दिव्यांगांना शारीरिक कमतरतेमुळे उदरनिर्वाह करताना अनंत अडचणी येतात त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून त्यांना मनात न्यूनतेची भावना न बाळगता व कोणाच्याही दयेवर ने जगता त्यांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी आवाहन केले. सदर उपक्रम. यशस्वीरित्या पार पाडण्याकामी अशोक नागरगोजे यांना उत्तम सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी, प्रमोद ढमाले, अनिल ठवरे, प्रविण पानसरे, सचिन गर्जे, प्रनील काकडे, रोहिदास चोरमले, शंकर पवार, निलेश भागवत, प्रतिक पानसरे, रोहिदास भागवत, काशिनाथ जगताप यांचे सहकार्य व डॉ. मधुकर आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दौंड तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर, हनुमंत शितोळे, अरुण सोनवणे, महिला अध्यक्षा स्वाती भागवत, प्रकाश शितोळे, बाळु भागवत, लक्ष्मण चव्हाण यांनी बहुमूल्य योगदान दिले. यावेळी पाटस येथील सर्व दिव्यांग बंधुभगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!