जिजाऊ संघटनेची एक हाती सत्ता तालुक्यात निलेश सांबरेचा दरारा 

रायतळे ग्रामपंचायतीवर जिजाऊची एक हाती सत्ता .
१६ ऑक्टोबरला झालेल्या ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या निवडणुकीत तालुक्यात जिजाऊने दाखवलेल्या धसक्याने जव्हार मध्ये चांगलेच वातावरण तापले होते .
जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायतीवर जिजाऊने एक हाती सत्ता काबीज केली आहे .
सरपंच पदी अरुणा चौधरी ,तर उप सरपंच पदी संतोष गोविंद , यांची निवड करण्यात आली आहे .
तसेच आपटाळा ग्रामपंचायतीत पांडुरंग भोये यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे .
दरम्यान प्रथमच थेट सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत जिजाऊने जव्हार तालुक्यात १० सरपंच निवडून आणल्याचा दावा करत .
पहिल्यांदाच जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना चांगला धक्का दिला आहे .
तसेच मतदारांनी पहिल्याच निवडणुकीत जिजाऊ संघटनेला जास्तीत जास्त ठिकाणी मतदान करून पहिली पसंती दिली आहे . तसेच कासटवाडी ग्रामपंचायतीत शिवनेरी पॅनलचे वर्चस्व .
सरपंच पदी कल्पेश राऊत तर उप सरपंचपदी सुलोचना चौधरी , त्याचबरोबर येणारा काळात जव्हार अर्बन बँक निवडणुकीत जिजाऊ संघटनेमार्फत जवळ जवळ ३० ते ३५ फॉर्म भरून पूर्ण ताकदीने बँकेच्या निवडणुकीत जिजाऊ संघटना उतरणार आहे .
तसेच जिजाऊ संघटनेचा पुढचा टार्गेट जव्हार नगरपरिषद देखील आहे
जिजाऊ संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे . येणाऱ्या काळात जव्हार अर्बन बँकेत तसेच नगर परिषदेमध्ये जिजाऊ संघटनेची घोडदौड कोण रोखू शकतो याकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे ।……
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!