कुरकुंभ MIDC मधील अज्ञात कंपनीचा गजब कारभार केमिकलयुक्त घन कचरा टाकला उघड्यावर

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी..

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील कुरकुंभ महाराष्ट्र औद्योगिक वसाहत हे केमिकल झोन म्हणून ओळखले जाते. या औद्योगिक क्षेत्रामधील प्लॉट नं. ऐ ८५ या वीस वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या कंपनीच्या मोकळ्या जागे मध्ये एका अज्ञात कंपनीने
रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घातक घन कचरा ( हजार्डस्ट वेस्ट ) उघडयावरच टाकल्याचे समोर आले आहे.
कंपन्यांना ( हजार्डस्ट वेस्ट ) या केमिकल मटेरियल ची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियम व अटी घालून सुदधा कंपन्या राजरोश पणे हे घातक घनकचरा केमिकल उघड्यावर टाकत असल्याची घटना घडलीय. सदरची घटना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सर्जीराव भोई यांनी या बंद अवस्थेत असलेल्या कंपनीची पाहणी केली. सदरच्या ठिकाणी असलेल्या केमिकलची ( हाजार्डस्ट वेस्ट ) घातक घन कचऱ्याचे नमुने गोळा करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यलयात जमा केला जाईल व सदरचा केमिकल युक्त कचरा ज्या कंपनीचा असेल त्या कंपनीवर कारवाही करण्याचे आश्वासन दिले. सदरचे केमिकल घातक कचरा खूप मोठ्या प्रमाणात विषारी असून हा पावसाच्या पाण्यात मिसळून सजीवांच्या पिण्याच्या पाण्यामधून शरीरात गेला तर आरोग्यास अपायकारक असतो. तसेच या ठिकाणापासून खलील बाजूस कुरकुंभ गावात या ठिकाणावरून पावसाच्या पाण्यात हे केमिकल पाणी जाऊन मोठी इजा होऊ शकते कुरकुंभ औद्योगिक वसाहत हे केमिकल झोन असल्याने या कुरकुंभ पांढरेवाडी हद्दीतील हजारो एकर शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत या अशा केमिकल युक्त कचरा कंपनी जर उघड्यावर टाकत असेल तर या केमिकलमुळे येथील वावरणाऱ्या प्राण्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाही करण्याची मांगणी येथील ग्रामस्थ करीत आहे. अधिक माहिती घेतली असता सदरच्या ठिकाणी असलेले केमिकलयुक्त घन कचरा हा सदरच्या अज्ञात कंपनीने अंदाजे पाच ते सहा टन ट्रॅक्टर च्या सहाय्याने या ठिकाणी टाकला असल्याचं बोललं जातंय. या कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये असे कृत्य करणाऱ्या कंपनी वर कारवाई करावी अशी मांगणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!