एका कंपनीत सोळा वर्षीय बालकामगाराचे काम करताना तुटले एक बोट..

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये एका कंपनीत सोळा वर्षीय बालकामगाराचा मशीनमध्ये बोट जाऊन बोट कट झाल्याची घटना घडलीय.कुरकुंभ एमआयडीसीत कंपन्यांमध्ये सुरक्षेचे तीन तेरा वाजलेत. अनेक कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात होत असतात परंतु कंपन्या व ठेकेदार असे प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत असतात असाच प्रकार, कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील रायटेबल स्टेशनरी हब या कंपनीत एका बालकामगाराच्या एका बोटाला रबर कट करणाऱ्या मशीन ने आत ओढल्याने एक आक्खे बोट कट झाले तर दुसऱ्या बोटाला जखम झालीय सदरचे प्रकरण हे पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत झाला होता. परंतु कंपनीने संबंधित झालेले प्रकरण हे संबंधित औद्योगिक सुरक्षा अधिकारी, तसेच दौंड-कुरकुंभ पोलीस स्टेशन ला देखील कळवले नसून सदर कंपनी तसेच ठेकेदार यांनी झालेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणात रवी कुमार यादव ( वय१६ वर्ष ) या कामगाराचे नाव असून सदरचा कामगार हा मूळ बिहारचा असून सध्या झगडेवाडीत राहत आहे.सदर चा कामगार हा सोळा वर्षीय आहे सदर घडलेल्या प्रकाराबाबत कंपनी प्रशासनाला विचारले असता संबंधित विषयाबाबत टाळाटाळ केली मंग काही वेळाने संबंधीत कामगाराच्या हाताला लागले आहे. असे सांगितले. हा कामगार कंपनीच्या निम कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत आहे. त्यामुळे त्या कामगाराला पी एफ (PF) व इ एस आय सी (ESIC) लागू होत नसल्याचे कंपनी एच आर यांनी सांगितले. सदरच्या कंपनीत असणाऱ्या अदेशा सर्व्हिसेस या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सदरचा कामगार काम करत होता .कंपनीत झालेल्या प्रकारात कंपनी ठेकेदार यांनी त्या कामगाराला कंपनीतून खासगी वाहनाने दौंड येथे खासगी रुग्णालयात दाखल करून त्यावर उपचार केला. तसेच त्या कामगाराला ठेकेदार, कंपनी यांनी घरीच ठेवले व त्यानंतर त्या कामगाराला पगारी सुट्टी न देता त्या कामगाराला कंत्राट च्या सुपरवायजर ने धमकावून कामगार राहत असलेल्या ठिकाणी जाऊन धमकावून रूम खाली करून येथून बिहारला निघून जा तुला इथं कोण सपोर्ट करत ते बघतो असे धमकी देऊन त्याला धमकी दिली व रात्री बेघर करून त्याला तेथून हाकलून दिले. तरी संबंधित कामगाराला न्याय मिळवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मांगणी कामगार करत आहे.

एकवीस हजार पगारा खालील असणाऱ्या कामगारांना ई ई एस आय सी (ESIC) हा लागू होतो

कुठल्याही कामगाराला कामावर घेत असताना कामगाराचा ESIC नंबर काढणे आवश्यक आहे.

अरविंद कुमार
कर्मचारी राज्य निघम
ई एस आय सी (ESIC) अधिकारी कुरकुंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!