
तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन..
नेवासा तहसिल कार्यालयावर पनवेलचा तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन
करण्यात आले वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयावर पनवेलचा तडिपार गावगुंड जग्या गायकवाड याने अतिशय निचपातळीचे विधान करुन बेताल वक्तव्य केल्याचे निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले होते.* *यावेळी आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तिव्र घोषणा देत आंदोलन करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, शेख सलीम जिलानी, काशिनाथ चौगुले,शहा सलीम अकबर, इनामदार मुसाभाई, शिवाजी म्हस्के, गव्हाणे नामदेव जगन्नाथ,इसाक इनामदार,सुनील गायकवाड, वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका सचिव डॅनियल देठे, संपर्कप्रमुख अंतोन भाऊ गोर्डे, महिला तालुकाध्यक्ष उज्वलाताई गोर्डे, महिला संपर्कप्रमुख विजया घोलवड, महासचिव उषाताई उन्हवणे,योगेश बोर्डे, अविनाश अडागळे,सहादू पवार,भास्कर लिहिणार मामा, भारतीय बौद्ध महासभेचे पंडित बी.बी.,शिवाजी राक्षे,माधव भाऊ ननवरे,भगवान दळवी,*ख्रिस्ती आघाडीचे पास्टर डी.बी अमोलिक, पा.मार्कस जाधव, पा.नितीन चक्रनारायण, ब्र.सतीश थोरात.* *वंचित बहुजन आघाडीचे नेवासा शहराध्यक्ष अफरोजभाई सय्यद, उपाध्यक्ष लखन चक्रनारायण सचिव विशाल नारायण संघटक ईश्वरदास चक्रनारायण, येसुदास चक्रनारायण, देवा चक्रनारायण, आनंद चक्रनारायण दिनेश चक्रनारायण,गौरव साळवे, अतुल साळवे,विकी साळवे,परेश चक्रनारायण किरण चक्रनारायण,आदेश चक्रनारायण,शिरीष चकनारायण,राज थोरात.*व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसील कार्यालय नेवासा येथे निषेध आंदोलन पार पडले.*यावेळी बोलताना वंचितचे तालुका अध्यक्ष हरिश चक्रनारायण शेख प्यारेलालभाई यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणाले की पनवेलचा तडीपार गावगुंड जग्या गायकवाड हा गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक केसेस चालू आहेत तसेच त्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्याला ताबडतोब अटक करून त्याचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अवैध मार्गाने कमावलेली जंगम मालमत्ता,संपत्ती व बँक अकाउंट डिटेल्स याची सखोल चौकशी होऊन अवैद्य मार्गाने मिळविलेल्या संपत्तीचे ऑडिट करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.* *वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, लिहिणार मामा, शेख सलीम जिलानी, पंडित बी.बी, येडूभाऊ सोनवणे, यांनी आपल्या पायातील बूट व चप्पल काढून जग्या गायकवाड यांच्या पुतळ्याला झोडपून काढले व व सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.* यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली व त्यांनी आपल्या शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला *यावेळी नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी निषेध आंदोलनाचे निवेदन स्वीकारले व यावर त्वरित कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना कडे पाठपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे वतीने उप पोलीस निरीक्षक विजय भोंबे साहेब,गोपनीय विभागाचे पोलीस नाईक राजू केदार, नेवासा बिट हवालदार तुळशीदास गीते, व स्टाफ यांनी आंदोलन कर्तेंना संरक्षण पुरविले होते,यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांना विनंती वजा निरोप पाठवला होता की पुतळ्याचे तहसील कार्यालयासमोर दहन करू नये,त्यावर हरीशदादा चक्रनारायण यांनी सांगितले की ठीक आहे…! आम्ही तहसील पुढे दहन करणार नाही मात्र तहसील पुढे चप्पल व बुटांनी त्या जग्या गायकवाड च्या पुतळ्याला झोडून काढू व नंतर त्याला उकिरड्यावर फेकून देऊ असे ठरले.* यावेळी वंचित चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनामध्ये भाग घेतला व जग्या गायकवाड च्या पुतळ्याला चप्पल बुटांनी झोडुन काढलें. यावेळी उपस्थितांचे,व पोलीस प्रशासनाचे काशीनाथ चौघुले यांनी आभार मानले,*