जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर… 

जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक .
आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले या बँकेची निवडणूक महाराजांच्या काळापासून लोकशाही पद्धतीने होत आहे .
नुकतीच झालेली अर्बन बँकेची निवडणूक ,
या निवडणुकीत बँकेच्या सर्व सभासदांनी लोकशाहीने आपला हक्क बजावत या बँकेत .
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जनसेवा पॅनलचे १७ पैकी १४ संचालक निवडून दिले .
आजपर्यंत महाराजांच्या कार्यपद्धतीने चाललेली अर्बन बँकेत लोकशाही जिवंत आहे .
दरम्यान जव्हार शहरात मर्चंट नागरीक सहकारी संस्था देखील आहे .
ही संस्था जव्हार शहरातील राष्ट्रवादी पक्षाची बँक समजली जाते .
या बँकेला देखील २० ते २२ वर्षे होऊन गेले आहे . मध्यंतरी कोरोना काळ असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आले होते .
बँकेच्या अहवालानुसार ४५ लाखाचा नफा या बँकेने जाहीर केला आहे . परंतु या संस्थेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होताना दिसत नाही .
या बँकेने मागील निवडणुकीत बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती .
या निवडणुकीत बँकेचे संचालकांनी त्यांच्या मर्जीतले संचालक घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती यामध्ये यांच्या विरोधात शहरातील दोन समाजसेवक पुढे आले .
धनंजय बाबुराव खेडकर , व जहीर शेख ,
परंतु मर्चंट बँकेतील काही संचालकांनी व तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर रित्या जहीर शेख यांच्या नामनिर्देशन फॉर्म माघारी घेण्यास भाग पाडले होते .
त्याचबरोबर दुसरा उमेदवार धनंजय बाबुराव खेडकर यांना देखील त्याच पद्धतीने माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता .
परंतु लोकशाही जिवंत आहे हे या ठिकाणी धनंजय खेडकर यांनी १७ उमेदवारासमोर एकटे उभे राहून दाखवून दिले .
व निवडणूक लढवून हार पत्करली पण माघार घेतला नाही .
दरम्यान मर्चंट संस्थेची २०२३ या निवडणुकीची सभासद यादी जाहीर करण्यात आली आहे .
आता येणाऱ्या काळात कायद्याच्या चौकटीत राहून हे संचालक व संबंधित अधिकारी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतील का ?
तसेच बेकायदेशीर पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतील का ?
याकडे सर्व जव्हार शहर व तालुक्यातील सभासद व मतदानाचा हक्क बजावणारे मतदार व सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे ।……
—————————-–————–-
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख ।…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!