पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व या विषयावर कृषि विभागाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२२-२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे यानिमित्त संपूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्या विषयी जनजागृती सुरू आहे याचाच एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे बाजरी तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी पौष्टिक तृणधान्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा असे आवाहन केले. दौंडचे आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी विविध तृणधान्याची ओळख करून दिली. जिल्हा संसाधन व्यक्ती दिलावर शेख यांनी उपस्थित शेतकरी व महिला भगिनी यांना विविध तृणधान्यापासून खाद्यपदार्थ निर्मिती व त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक अझरुद्दीन सय्यद यांनी बाजरीचे आहारातील महत्त्व समजून सांगितले.यावेळी पांढऱेवाडी गावच्या सरपंच छायाताई झगडे, उपसरपंच आरती झगडे व पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्य सलमा सय्यद, संदीप जगताप तसेच छगन झगडे, गणेश शिंदे, रेखा निंबाळकर, संध्या शितोळे, कृषिसहाय्यक शंकर कांबळे, प्रकाश लोणकर, राहुल लोणकर, मोनिका दिवेकर, संदीप सरक कृषिमित्र नितीन बनकर व परिसरातील महिला व तरुण शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिपर्यवेक्षक अतुल होले यांनी केले अंगद शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!