गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मेडीसिन देऊन स्वाभिमान दिवस साजरा.

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मेडीसिन देऊन स्वाभिमान दिवस साजरा.

गेवराई : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय रुग्णालयात अनेक औषधी व ईतर अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होत आहे.
हा औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे वंचीत बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट मा. खा. एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हीड-१९ सबंधित अत्यावश्यक असणाऱ्या औषध गोळ्या, इंजेक्शनच्या स्वरुपात मदत केली. यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी १ हजार व्हीटामिन सी गोळ्या आणि १ हजार व्हिटकोफॉल सी इंजेक्शन स्वरुपात कोव्हीड-१९ सबंधित अत्यावश्यक असणारे औषधे उपजिल्हा रुग्णालय गेवराईचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. चिंचोळे, तहसिलदार सचिन खाडे यांच्याकडे सुपूर्द करुन स्वाभिमानी दिवस साजरा केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुकाध्यक्ष पप्पु गायकवाड, मा. अजय खरात, किशोर भोले, सतिष प्रधान, शरद खापरे, ज्ञानेश्वर हवाले,अनिल राठोड, प्रदिप शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळत कोव्हीड-१९ च्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधांचा अभाव निर्माण होत असल्याने यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार करण्यात अनेक अडचणी येत असतात आणि शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा करणार्या डॉक्टर, नर्स यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते यामुळे रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातील स्टाफला गैरसमजातून विनाकारण त्रास देत असतात, आरोग्य कर्मचारी यांच्यावरील वाढणारा ताण व रुग्णांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा. खा. एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिवस साजरा करतांना कोणतीही अतिशबाजी किंवा बॅनरबाजी न करता गरजु रुग्णांना आडचणिच्या परस्थीतीत औषध, गोळ्यांची अत्यावश्यक मदत केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!