बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक पदी धर्मराज आहेर यांची नियुक्ती.

बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक पदी धर्मराज आहेर यांची नियुक्ती.

गेवराई : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. अदीत्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे, मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक पदी धर्मराज आहेर यांची ना. एकनाथजी शिंदे, संजय चिवटे कक्षप्रमुख वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देवुन नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक पदी निष्ठावंत शिवसैनिक धर्मराज आहेर यांची निवड झाल्या मुळे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत तसेच सर्वस्तरातुन सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

निष्ठावंताला शिवसेना पक्ष नेहमीच न्याय देतो असतो.
रुग्णसेवेची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली
शिवसेना नेते नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे
खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आशीर्वादाने
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून व आनंदजी जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख बीड माजी मंत्री बदामराव पंडित, उज्ज्वलाताई धर्मेंद्रजी भोपळे यांच्या शिफारसीवरून माझी
वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मला अधिकृतरित्या ही पहिली जबाबदारी होती व खूप मोठी अशी जनसेवेची जबाबदारी मला मिळाली हे माझं भाग्यच शिवसेना पक्षातील वरिष्टांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. समाजातील निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचारासाठी सर्व प्रकारची सेवा मी या माध्यमातून देण्यासाठी कटिबद्ध राहील माझी वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक पदी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार मानतो व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजतो व यापुढे गोरगरीब, दुर्बल घटकातील गरजु रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिद्धीविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवुन देण्यासाठी शिवसेना भवन येथील मुख्य कार्यलयात पाठपुरावा करेल. असे धर्मराज मधुकरराव पाटील आहेर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!