
आ शिरीष चौधरी यांचे फैजपुर शहर वासीयांनी मानले आभार..
आ शिरीष चौधरी यांचे फैजपुर शहर वासीयांनी मानले आभार
—————————————-
*राजु तडवी फैजपुर*
फैजपूर शहरातील नवीन व जुन्या कॉलोनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरण साठी महाराष्ट्र शासन च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषद ला 2 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातील कॉलोनी भागातील नागरिकांनी आ. शिरीष दादा चौधरी यांची खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शहरातील कॉलोनी भागातील मंजूर कामे पुढील प्रमाणे 1) यावल रोडवरील वृंदावन कॉलोनी मध्ये खडीकरण व काँक्रिटिकरण करणे, 2) साने गुरुजी नगर वेल्डिंग वर्कशॉप पासून जानकी नगर पर्यंत काँक्रिटिकरण करणे, 3) साने गुरुजी नगर भाग 2 मधील संपूर्ण परिसरात काँक्रिटिकरण करणे, 4) लक्ष्मी नगर परिसरात काँक्रिटिकरण करणे, 5) मिरची ग्राऊंड भागात काँक्रिटिकरण करणे, 6) आसाराम नगर मधील ओपन स्पेस मध्ये बाल संस्कार केंद्र बांधणे. या व्यतिरिक्त ताहा नगर, न्हावी दरवाजा भागातील काही रस्ते ही मंजूर करण्यात आलेले आहेत, आभार प्रसंगी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम तडवी, चंद्रकांत चौधरी, राहुल महाजन, मुरलीधर राणे, अशोक किरंगे गुरुजी, गणेश पाटील, राहुल फेंगडे, मनोज पाटील गुरुजी, सुरेश कोलंबे, कुंदन चौधरी सर, प्रशांत गाजरे, कमलाकर गुळवे, योगेश चोपडे, रमेश बोरोले, प्रशांत कपले, वासुदेव कपले सर, डॉ. हरी निळे, दिनेश किरंगे सर यांसह आदी नागरिक उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...