विजेचा करंट लागून एका कामगाराचा मृत्यू : कुरकुंभ एमआयडीसी मधील घटना

विजेचा करंट लागून एका कामगाराचा मृत्यू :
कुरकुंभ एमआयडीसी मधील घटना

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सनराईज फाईन केमिकल्स या कंपनीत विद्युत करंट ( शॉक ) लागुन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी हार्मोनि ऑर्गनिक्स या कंपनीत देखील एका कामगाराला करंट शॉक लागून आपला जीव गमवावा लागला होता. या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे औद्योगिक वसाहत मधील काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदरची घटना शुक्रवारी ( ता.१४ ) मे रोजी सनराईज फाईन केमिकल कंपनीत घटना घडली असून यामध्ये संदीप कुमार चर्मकार ( वय २४ , सध्या रा . कुरकुंभ , ता . दौंड , मुळ रा. कोटारा खुर्द . ता . जवा जि . रिवा , मध्य प्रदेश ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे . याबाबत नारेंद्र रामगरीब वर्मा ( वय २६ , सध्या रा . कुरकुंभ , ता . दौंड ) यांनी दौंड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे . याबाबत अधिक माहितीनुसार, नारेंद्र वर्मा हे कंपनीमध्ये रात्रपाळीच्या ( नाईट ड्युटी ) कामासाठी गेले होते . त्याच्यासोबत हेल्पर म्हणून काम करण्यासाठी अरविंद वर्मा आणि संदिप कुमार चर्मकार हे दोघे होते . कंपनीतील प्रोसेसिंग रूममध्ये कॉस्टीक केमिकलचे बॅचचे काम सुरू होते . केमिकल स्क्रू कनव्होअर मशिनद्वारे रिअॅक्टरमध्ये टाकण्यासाठी अरविंद वर्मा व संदिप कुमार चर्मकार हे स्क्रू केन वेअर मशीन चालू करण्यासाठी रिअॅक्टर जवळ घेण्याची तयारी करीत होते . स्क्रू केनव्होअर ओढत असताना मशीनचा स्टीलचा पाईप टेंम्प्रेचर कंट्रोलचे इलेक्ट्रिक लाईटच्या वायरला धडकून वायर कट होऊन
यावेळी इलेक्ट्रिक कंरट स्क्रू कनव्होअर मशीनला आल्याने संदिप कुमार चर्मकार याला विजेचा करंट लागुन तो मशीनला चिकटला . प्रोसेसिंग रूममधील विद्युत प्रवाह बंद केल्यावर संदीप जमिनीवर पडला . त्यानंतर त्याला कंपनी मधील सोबत काम करत असणाऱ्यांनी त्याला दुचाकीवरून कुरकुंभ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . पंरतु त्यास दौंड येथील रूग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला . त्यानंतर त्याला मोटारीतून दौंड येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले . सकाळी सात वाजता त्याला तपासले असता , त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . असे फिर्यादीत म्हंटले आहे सदर शवविच्छेदनानंतर मृतदेह मध्यप्रदेश येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सदर घटने बाबत तसेच मृतमुखी पडलेल्या कामगाराच्या पी एफ व इ एस आय सी संदर्भात कंपनीचे संचालक संजय पारेख यांना विचारले असता कामगार काम करत असताना त्याला करंड लागल्याने तो मृत झाला असून सदर कामगार हा पंधरा दिवसांपासून कामाला येत होता त्यामुळे त्याचे पी एफ व इ एस आय सी नाही असे यावेळी पारेख यांनी सांगितले

एक दिवस जरी कामगार कंपनीत काम करत असेल तर त्याचा पी एफ ( Pf ) व इ एस आय सी (Esic) हा काढला जातो परंतु संबंधित कंपनी मध्ये मृत झालेला व्यक्ती पंधरा दिवसांपासून काम करत आहे. यावर कंपनी काही तरी फिरवा फिरवी करत असल्याचं दिसत आहे. निश्चित कंपनी मध्ये त्या कामगाराला करंट लागून मृत्यू झाला आहे का की हा अपघाताने झाला आहे याची चौकशी संबंधित विभागाने करावी तसेच कंपनी मध्ये कसल्याही प्रकारची सुरक्षा सेफ्टी देत नाही
संबंधित कंपनी कंपनीत कामगांच्या जीविताशी खेळत असल्याचं चित्र आहे. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही .असे औद्योगिक वसाहत मध्ये अपघात वारंवार घडत आहेत तरी संबंधित विभागाने होणाऱ्या अपघातांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

नवनाथ गायकवाड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष दौंड तालुका

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!