तौक्ते चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी..

*कार्यतत्पर उपसभापती डहाणू -मा.श्री.पिंटू धर्मा गहला साहेब यांनी तौक्ते चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.*

*पालघर विशेष*
तौत्के चक्रीवादळाचा डहाणू तालुक्यामध्येही फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. डहाणू तालूक्यातील उन्हाळी भात शेती,फळबाग,घरावरील छप्पर,विजेचे खांब यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
उपसभापती साहेब यांनी डहाणू तालुका कृषी अधिकारी श्री.संतोष पवार साहेब,ग्रामसेवक,कृषी सेवक यांना सोबत घेऊन सारणी,उर्से,दाभोण,रणकोळ ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसान ग्रस्त शेती,फळबाग,घरे,वीजेचे खांब यांची पाहणी करून सोबत असलेले कृषी अधिकारी,ग्रामसेवक तसेच तलाठी,MSEB अधिकारी यांना फोन करून सबंधित जागेचे त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना केल्या.
तौक्ते चक्रिवादळामुळे विडभट्टींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.त्यांचेही पंचनामे करण्याच्या सुचना सबंधित अधिका-यांना दिलेल्या आहेत.
तौक्ते चक्रिवादळाचा फडका बसलेल्या लोकांनी सात-बारा,आधारकार्ड,बॅंक पासबुक झेरॉक्स आप-आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन उपसभापती साहेब यांनी केलेले आहे.

*पालघर जिल्हा रिपोर्टर माधव तल्हा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!