प्रदूषणाच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी केली पाहणी…

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद –

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील दूषित केमिकलयुक्त सांडपाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या औद्योगिक वसाहत मधून होणाऱ्या केमिकलयुक्त सांडपाण्याचा तक्रारी अनेक वेळा करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने या दूषित केमिकलयुक्त सांडपाण्याच्या प्रश्नावर दौंड चे तहसीलदार संजय पाटील पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी पाहणी केली. तसेच याबाबत संबंधीत अधिकारी व ग्रामस्थ , शेतकरी यांच्यात औद्योगिक वसाहत कार्यालय येथे बैठक झाली. याबैठकीत ग्रामस्थांनी अनेक कंपन्या कंपन्यांच्या बाहेर दूषित केमिकल सांडपाणी सोडत असून या प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी यावेळी केल्या.परंतु कारवाई केली जात नसल्याचे आरोप यावेळी नागरिकांनी केले. दूषित केमिकल युक्त सांडपाणी थेट पुणे सोलापूर हायवेच्या सेवा रस्त्यावर आल्याने नागरिक व प्रवाश्यांना कसरतीने प्रवास करत आहे . अनेक कंपन्या कंपनीच्या बाहेर दूषित केमिकलयुक्त सांडपाणी सोडत आहे. याबाबत नागरिक शेतकरी त्रस्त आहे. परंतु याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप यावेळी नागरिकांनी केले.ज्यावेळेस तक्रार त्यावेळेस सांडपाण्याचे नमुने घेतात ज्यावेळस कारवाईची मांगणी केली जाते त्यावेळेस सांडपाण्याच्या नामुनेचा अहवाल दाखवला जातो. अशी अवस्था आजतागायत नागरिकांनी सहन केली.याबाबत नागरिकांनी तहसीलदार यांना अनेक कंपन्यांची प्रदूषणावर तक्रारी केल्या यावेळी नागरिकांच्या तक्रारीवर संबंधित विभागाने कारवाई कारवाई असे तहसलीदार संजय पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर पंधरा दिवसात कारवाई करणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले. नक्की प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी दौंड चे तहसीलदार संजय पाटील , पोलीस निरीक्षक नारायण पवार, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी विजय पेटकर , प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप, सर्जेराव भोई , तलाठी संतोष इडूळे, सी ई टी पी चे नरशिंग थोरात पाटस टोलचे मेंटनस अधीकारी सुनील तिवारी, सरपंच राहुल भोसले, ग्रामपंचायत सदस्य आयुब शेख ,उमेश सोनवणे, सुनील पवार, गणेश कुलंगे, तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!