
पिंगेवाडी ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग पाच टक्के निधी वाटप:-चाँद शेख
पिंगेवाडी ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग पाच टक्के निधी वाटप:-चाँद शेख
शासन निर्णयानुसार पिंगेवाडी येथील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मार्च अखेर वाटप करण्यात यावा याबाबत सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी सर्वच ग्रामपंचायतीस विनंती केली होती त्यानुसार आज पिंगेवाडी येथील सरपंच मंगल अण्णासाहेब जाधव व ग्रामसेवक सुनील राठोड यांच्या उपस्थीतीत दिव्यांगाचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला
कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या परिस्थिती पाहता जिवनावश्यक वस्तु किराणा सामान खरेदी करण्यात आले.यावेळी खरेदी विक्री संघ शेवगाव संचालक तथा माजी सरपंच पिंगेवाडी अशोक तानवडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा सचिव नंदकिशोर मुंढे,सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख,
मुस्लिम संघटना अध्यक्ष युसुब शेख,प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब सोनाजी जाधव उपस्थितीत होते
पिंगेवाडी ग्रामपंचायत मधील सोळा दिव्यांग बांधवाना प्रत्येकी चारशे रुपये चेक सरपंच सौ मंगल अण्णासाहेब जाधव,यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी उपसरपंच संगीता मच्छिद्र जायभाये,ग्रामपंचायत सदस्य संजय तानवडे,अतिष अंगरख, उज्ज्वला मुंढे, रंजना तानवडे,
परवीन शेख,फरीदा शेख,शैलेश गर्कळ,ग्रामपंचायत कर्मचारी रवी नागरे,रमेश अंगरख यावेळी हजर होते. सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने चाँद शेख यांनी ग्रामसेवक सुनील राठोड यांच्यासह सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच उपस्थित मान्यवरांचे तसेच ग्रामस्थांचे आभार मानले.