शिवखडक येथे वाघाचा शेळयांवर हल्ला.
शेख युनुस ःराहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील आदिवासी भागातील शिवखडक येथे वाघाने हल्ला करून १शेळी ठार मारून पलायन केले. शिवखडक येथील हरिभाऊ लिंबा जाधव यांच्या शेळीपालन व्यवसाय आहे. शेताच्या बांधावर शेळ्या घेऊन चारण्यासाठी ते सकाळी ११ते १२ च्या सुमारे गेले असता,शेजारील जंगलातून वाघाने चरत असलेल्या सुमारे २० शेळ्यातून १शेळी ठार मारली .शेळ्या चारण्यासाठी महिला असल्याने त्यांना काही सुचेना त्यांचाआरडाओरडा ऐकून वाघाने धूम ठोकली.