दहिगाव-ने  मार्फत  जागतिक  दुग्ध दिनाच्या निमित्ताने आयोजित पशुपालन कार्यशाळा…

*श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने  मार्फत  जागतिक  दुग्ध दिनाच्या निमित्ताने  आयोजित पशुपालन कार्यशाळा*

श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१ जून २०२१ रोजी पशुपालन कार्यशाळा या विषयी कार्यक्रम कोविड– १९ च्या नियमाला अधीन राहून ओनलाईन पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विश्वस्त श्री काकासाहेब शिंदे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार व संशोधन संचालक डॉ शरदराव गडाख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर कौशिक वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख यांनी केले.
या कार्यक्रमा अंतर्गत पशुपालन व्यवसायचे यश व  पशूंची  आनुवंशिकता यातील सहज संबंध या विषयावर क्रांतीसिह नाना     पाटील पशुवैद्यकीय मखविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक डॉ तेजस शेंडे यांनी मार्गदर्शन केले, यामध्ये त्यांनी जनावरांची निवड, पशुपालनातील नोंदीचे महत्व इ. विषयावर प्रकाश टाकला. मुंबई येथील प्रसिद्ध पशुआहार तज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी पशुपालनातील सुयोग्य आहार व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना चारा व्यवस्थापन, पशुपालकांचे अर्थशास्र, मुरघास, आहारातील कोरड्या चा-याचे महत्व इ विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्रातील पशुधन विभागाचे डॉ सोमनाथ भास्कर यांनी स्वच्छ दूध उत्पादन या विषयी सांगितले यामध्ये प्रतिजैविके विरहीत दुध, स्तन दाह वरील प्राथमिक उपचार व प्रतिबंध इ विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इं. राहुल पाटील यांनी केले तसेच आभार श्री नंदकिशोर दहातोंडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी केंद्रातील प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे व प्रवीण देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!