शिवस्वराज्य दिन पिंगेवाडी येथे साजरा :- सरपंच मंगलताई जाधव

शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून उपअभियंता श्री राजेंद्र पांडुळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंचाने केला नागरी सत्कार*

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
मौजे पिंगेवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन सरपंच मंगलताई जाधव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी औद्योगिक विकास महामंडळ चे उपअभियंता श्री राजेंद्र पांडुळे यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढी उभारून पूजा करण्यात आली.शिवस्वराज्य दिनाचे आचित्य साधून औद्योगिक विकास महामंडळ मध्ये नुकतेच उपअभियंता पदी पदोन्नती मिळलेले श्री राजेंद्र पांडुळे साहेब यांचा ग्रामस्थांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक मंगलताई जाधव यांनी शाल श्रीफळ देऊन नागरी सत्कार केला.यावेळी ग्रामसेवक सुनील राठोड,सरपंच मंगलताई जाधव,उपसरपंच संगीताताई जायभाये,ग्रामपंचायत सदस्य फरीदा शेख,परवीन शेख,शैलेश गर्कळ, रंजना तानवडे,उज्ज्वला मुंढे,अतिष अंगरख,संजय तानवडे,शेवगाव खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक तानवडे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव नंदकिशोर मुंढे,सावली दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चाँद शेख,उपअभियंता राजेंद्र पांडुळे,मच्छिद्र जायभाये,मानिक जाधव,अण्णासाहेब जाधव,शरद शेलार,विलास देशपांडे,महादेव हजारे,सतीश मुंढे,प्रदीप तानवडे,अनिल तानवडे माजी चेअरमन,नजीर शेख,अस्लम शेख,सिद्धीक शेख,ग्रामपंचायत कर्मचारी रवी नागरे,रमेश अंगरख पिंगेवाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!