राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त मळद येथे रक्तदान शिबिर…

दौंड प्रतिनिधी :-आलिम सय्यद,

दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 वा वर्दापण दिन मळद येथे साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त मळद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मळद व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मळद यांच्या वतीने रक्तदात्यास एक इलेक्ट्रिक इस्त्री व एक वृक्ष भेट देऊन सन्मान केला . तसेच दिलेल्या वृक्षाची जोपासना करून त्या वृक्षापासून मिळणारा ऑक्सिजन हा सर्वांना उपयुक्त ठरणार असल्याचं देखील यावेळी आयोजकांनी व्यक्त केले. कोरोनाच्या महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांना रक्त त्वरित उपलब्ध व्हावे या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाचे एचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजन केले असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, तुषार रमेश थोरात, गुरुमुख नारंग, प्रकाश नवले, दत्तात्रय शेलार, तसेच मळद गावातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते शिबीर आयोजक , सुमित गायकवाड, सचिन जाधव , नितीन शितोळे, संकेत जाधव , अमित गायकवाड, वैभव जाधव , प्रशांत जाधव, यावेळी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!