दौंड तालुक्यातील शेतकर्‍यांचे विविध प्रश्नांबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी घेतली भेट..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यात वाढत असलेली बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांची कोलमडलेली अर्थव्यवस्था या गोष्टी लक्षात घेता तालुक्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग तयार होणे आवश्यक असून युवकांना व शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण मिळावे या करिता शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन दौंड तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र करावे ही मागणी करण्यात आली.

या बाबत मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत त्वरीत अहवाल मागवला आहे व तालुक्यातील असणा-या सर्व शेतकरी उत्पादक गटाला सहाय्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!